!! श्री तुळजाभवानी प्रसन्न !!

 || आई राजा उदो उदो,सदानंदीचा उदो उदो. श्री तुळजाभवानी माते की जय ||

श्री तुळजा भवानी मंदिर

महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठ पैकी श्री तुळजाभवानी देवीचे तुळजापूर क्षेत्र हे एक पूर्ण शक्तिपीठ आहे. ही देवी भवानी (भगवती) म्हणून प्रसिद्ध आहे. महाराष्ट्र क्षात्रतेजाची स्फूर्ती देवता , प्रेरणाशक्ती व स्वराज्य संस्थापक राजे श्री शिवछत्रपती यांची आराध्य दैवता अशी ही  तुळजापूरची भवानी देवी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे.
तुळजाभवानी मातेची मूर्ती गंडकीशिळेची असून तीन फूट उंचीची ही मूर्ती स्वयंभू आहे. अष्टभुजा महिषासुरमर्दिनी सिंहासनावर उभी असून मस्तकाच्या मुकुटातून केसांच्या बटा बाहेर आलेल्याआहेत. श्री तुळजाभवानी देवीच्या आठ हातात त्रिशूल, बिचवा, बाण,चक्र ,शंख ,धनुष्य ,पानपात्र आणि राक्षसाची शेंडी आहे. देवीच्या पाठीवर बाणाचा भाता असून देवीच्या उजव्या खांद्याजवळ चंद्र व डाव्या खांद्याजवळ सूर्य कोरलेला दिसतो. देवीच्या उजव्या पायाखाली महिषासुर व डाव्या बाजूला सिंह आणि पुराण सांगणारी मार्कंडेय ऋषी ची मूर्ती दिसते.

श्री तुळजा भवानी मंदिर पुजारी बद्दल माहिती

भावी भक्तांना सप्रेम नमस्कार
आम्ही तुळजाभवानी देवीचे शिवकालीन पुजारी आहोत.आम्हाला तुळजाभवानी देवीच्या धार्मिक पूजा विधीचे अधिकार लाभलेले आहेत. तुळजाभवानीचा पुजारी या नात्याने आम्ही भक्तांच्या धार्मिक पूजा पारंपारिक पद्धतीने करत असून आम्ही भक्तांची राहण्याची व जेवणाची उत्तम व्यवस्था करत असतो. श्री तुळजाभवानीचा आशीर्वाद सदैव आपल्या आणि आपल्या परिवाराच्या पाठीशी राहो हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना.भक्तांना श्री तुळजाभवानी देवी विषयी माहितीसाठी आम्ही आपल्या सेवेत सदैव हजर आहोत.
देवीचे मुख्य पुजारी
श्री संग्राम श्रीकांत झाडपिडे ( कदम )
शिक्षण :- BE ( E & T C )

श्री तुळजा भवानी मंदिर पूजा विधी

 श्री तुळजाभवानी देवीची अभिषेक पूजा आणि सिंहासन पूजा ही बुकिंग पद्धतीने करण्यात येत असून ज्या भाविकांना अभिषेक पूजा किंवा सिंहासन पूजा करायची असेल अशा भाविकांनी पूजा बुकिंग करण्यापूर्वी  संपर्क करावा. अभिषेक पूजा बुकिंग ही ऑनलाईन पद्धतीने असल्या कारणामुळे ज्या भाविकांना अभिषेक पूजा करायची असेल अशा भाविकांनी आपले आधार कार्ड फोटो पाठवणे गरजेचे आहे. ही नोंद घ्यावी.
Note :- Abhishek Puja and Sinhasan Puja of Shri Tuljabhavani Devi are being done by booking method and devotees who want to do Abhishek Puja or Sinhasan Puja should contact before booking the puja.  As Abhishek Puja booking is done online, devotees who want to perform Abhishek Puja need to send their Aadhaar card photo.  Note this.
 

Bhogi Puja
भोगी पूजा
Rs. 501

Naivaidya Puja
नैवेद्य पूजा
Rs. 251

Abhishek Puja
पंचामृत अभिषेक पूजा
Rs. 1100

Abhishek Puja (6 var )
पंचामृत अभिषेक पूजा ( ६ वार )
Rs. 1551

Abhishek Puja  9 var)
पंचामृत अभिषेक पूजा (९ वार)
Rs. 2100

Sadicholi Puja (6 Var)
साडीचोळी पूजा ६ वार
Rs.   751

Sadicholi Puja (9 var)
साडीचोळी  पूजा (९ वार)
Rs. 1100

Sinhasan Shrikhand Mahapuja
सिंहासन श्रीखंड महापूजा
Rs. 21000

Alankar Mahapuja
अलंकार महापूजा
Rs. 3100

Panache Ghar
पानाचे घर
Rs. 1551

Jagaran Gondhal Puja
जागरण गोंधळ पूजा
Rs. 1100

Mal,Pardi Puja
माळ, परडी पूजा
Rs. 1100

Gallery/फोटो गॅलरी

मंदिरातील उत्सव

तुळजाभवानी देवीचा छबिना उत्सव

श्री तुळजाभवानी मातेचा छबिना प्रत्येक मंगळवार ,पौर्णिमेच्या अगोदरचा एक दिवस ,पौर्णिमेचा दिवस, पौर्णिमेनंतरचा एक दिवस याप्रमाणे करण्यात येतो. फाल्गुन पौर्णिमेचा छबिना गुढीपाडव्याच्या दिवशी काढण्यात येतो व वर्षातील 21 निद्रा कालामधील मंगळवारी देवी शयन ग्रहामध्ये निद्रिस्त असल्यामुळे छबीना काढला जात नाही. बाकी वर्षभरात वरील प्रमाणे छबीना काढण्यात येतो. छबिना म्हणजे देवीची उत्सव मूर्ती एका चांदीच्या मेघडंबरीमध्ये व देवीच्या अनेक वाहना पैकी एका वाहनावर देवीच्या चांदीच्या अंबारी मध्ये चांदीची मूर्ती व पादुका ठेवून मंदिरा भोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करतात याला छबीना म्हणतात.

चैत्र शुध्द प्रतिपदा

(गुढीपाडवा)

गुढीपाडव्याच्या दिवशी चरणतिर्थाच्या वेळैस भाविकांनी अर्पण केलेला साखरेचा हार श्रीस घालण्याात येतो. चरणतिर्थ होवून सुर्यादय समयी मंदीराच्या मुख्य् शिखरासमोर छतावर मंदीर संस्था मार्फत गुढी उभारण्यात येते. तसेच श्री तुळजाभवानी मातेचा गाभारा आकर्षक फुलांनी सजवला जातो. आणि श्री तुळजाभवानी मातेची पूजा केली जाते.