हे शहर बालाघाटच्या एका कड्यावर वसले आहे. मंदिराच्या काही भागाची धाटणी हेमाडपंती आहे. इतिहास व पुरातत्त्वदृष्ट्या हे मंदिर राष्ट्रकुट अथवा यादवकालीन मानले जाते. तुळजाभवानी संबंधित सर्वांत जुना शिलालेख तुळजापूर तालुक्यातील ‘काटी’ येथे इ.स. १३९७ सालच्या शिलालेखात पहावयास मिळतो. मंदिराचे धार्मिक पूजेचे व्यवस्थापन व पुरोहिताचे अधिकार १५३ पाळीकर, भोपे कुळाकडे आहेत.
अक्षय तृतीया हा दिवस साडेतीन मुहुर्तापैकी एक दिवस व पितृ पुजनाचा दिवस असल्याने श्रीस अभिषेक पुजेनंतर महाअलंकार घालण्यात येतात .दिवसभराचे कार्यक्रम करण्यात येतात. संध्याकाळी देवीचा छबिना काढण्यात येतो.
गोमुख तीर्थकुंडात गायीच्या मुखातून पाण्याची धार सतत अखंडपणे वाहत असते. या तीर्थामध्ये भाविक दर्शनाला जाण्यापूर्वी येते स्नान करतात तसेच हातपायही धुतात .
होम कुंडाचे मंदिर पुरातन हेमाडपंथी पद्धतीचे आहे. होम कुंडावर उजव्या बाजूस टेकून गणेश मूर्ती आहे. होम कुंडाच्या पायाशी भैरवाची मूर्ती आहे.
तुळजाभवानी मंदिराच्या पाठीमागे हा दगड आहे त्याला आपण चिंतामणी दगड असे म्हणतो. हा चिंतामणी दगड सर्व प्रश्नांची उत्तरे देतो. चिंतामणी दगडावर एक नाणे ठेवून दोन्ही हात या दगडावर ठेवायचे आहेत. यानंतर आपण आपल्या मनातील प्रश्न आपण आपल्या मनातच विचारावा. त्यानंतर जर आपल्या प्रश्नाचे उत्तर हो असेल तर तो दगड उजव्या बाजूला फिरतो आणि जर उत्तर नाही असेल तर तो दगड डावीकडे फिरतो आणि जर दगड जागीच राहिला तर अजून आपल्या प्रश्नाचे उत्तर आले नाही आपण प्रतीक्षा करावी असा याचा अर्थ असतो.
हे स्थान श्रीक्षेत्र काशी प्रमाणेच येथे डोंगराच्या कड्यावर आहे. भोवताली रम्य झाडी असून पावसाळ्यात उंचावरून पाणी पडते. हे स्थान दर्शनीय व रमणीय आहे.
देवळाच्या मुख्य द्वाराजवळ उजव्या हाताकडे आदिमाया व आदिशक्ति ह्या देवता आहेत.
डोंगराच्या उतरणीवर किल्लेवजा,मजबूत,सुंदर देवस्थान आहे. आत देवीच्या पादुका आहेत. घाट्शीळवर उभारून देवीने श्रीरामाला सीतेचे रूप घेऊन श्रीलंकेचा मार्ग दाखविला. तेव्हा रामाने देवीला ओळखले व तो म्हणाला 'तू का आई?’ येथे असलेल्या कमानी पूर्वी रजाकारांवर देखरेख करण्यासाठी वापरत. जवळच मंदिर संस्थानने बांधलेली बाग आहे.
येथे रामवरदायिनी नावाची देवी असून जेव्हा श्री रामचंद्र वनवासात गेले होते. तेव्हा सीतेला शोधण्यासाठी रामचंद्र येथे आले असताना या देवीने त्यांना वर दिला व योग्य मार्ग दाखवला.
देवळाच्या मागील बाजूस म्हणजे शिवाजी दरवाजा उतरून खाली गेल्यावर हा मठ लागतो. याचे मूळ पुरूष रणछोड भारती. यांच्यासोबत श्रीदेवी सारीपाट खेळत असे. मठ जुना, मजबूत व प्रेक्षणीय आहे.
मंकावती कुंड हे तुळजापूरातील एक मोठे पवित्र कुंड आहे. असे म्हणतात की या कुंडात स्नान केल्याने अंग पवित्र होते. याला विष्णू कुंड असेही म्हणतात. यावर महादेवाची पिंड आहे. तसेच मोठे मारुती मंदिर आहे.
हया मठात गोरगरीबांना सदावर्त दिले जात होते. हा मठ सध्या खड्काळ गल्लीत आहे.
हा मठ दशनामगिरी गोसाव्याचा होत. सध्या हा येथील क्रांती चौकात आहे.
हे एक तीर्थ असून पापनाशिनी असे याचे प्राचीन नाव आहे. येथे स्नान केल्याने लोकांचे पापातून सुटका होते. अशी लोकांची धारणा आहे. देऊळ जुने पण मजबूत आहे.
येथून जवळच धाकटे तुळजापूर हे गाव आहे. या ठिकाणी तुळजा मातेची बहीण वास्तव्य करते
Copyright©2024. Tuljabhavani Pujari Tuljapur
Designed by DY Business Solutions