श्री तुळजाभवानी मातेचा छबिना प्रत्येक मंगळवार ,पौर्णिमेच्या अगोदरचा एक दिवस ,पौर्णिमेचा दिवस, पौर्णिमेनंतरचा एक दिवस याप्रमाणे करण्यात येतो. फाल्गुन पौर्णिमेचा छबिना गुढीपाडव्याच्या दिवशी काढण्यात येतो व वर्षातील 21 निद्रा कालामधील मंगळवारी देवी शयन ग्रहामध्ये निद्रिस्त असल्यामुळे छबीना काढला जात नाही. बाकी वर्षभरात वरील प्रमाणे छबीना काढण्यात येतो. छबिना म्हणजे देवीची उत्सव मूर्ती एका चांदीच्या मेघडंबरीमध्ये व देवीच्या अनेक वाहना पैकी एका वाहनावर देवीच्या चांदीच्या अंबारी मध्ये चांदीची मूर्ती व पादुका ठेवून मंदिरा भोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करतात याला छबीना म्हणतात.
(गुढीपाडवा)
गुढीपाडव्याच्या दिवशी चरणतिर्थाच्या वेळैस भाविकांनी अर्पण केलेला साखरेचा हार श्रीस घालण्याात येतो. चरणतिर्थ होवून सुर्यादय समयी मंदीराच्या मुख्य् शिखरासमोर छतावर मंदीर संस्था मार्फत गुढी उभारण्यात येते. तसेच श्री तुळजाभवानी मातेचा गाभारा आकर्षक फुलांनी सजवला जातो. आणि श्री तुळजाभवानी मातेची पूजा केली जाते.
(अक्षय तृतीया )
अक्षय तृतीया हा दिवस साडेतीन मुहुर्तापैकी एक दिवस व पितृ पुजनाचा दिवस असल्याने श्रीस अभिषेक पुजेनंतर महाअलंकार घालण्यात येतात .दिवसभराचे कार्यक्रम करण्यात येतात. संध्याकाळी देवीचा छबिना काढण्यात येतो.
(नागपंचमी)
चरणतिर्थ झालेनंतर भवानी शंकराचे पुजारी गुरव, इनामदार होमच्या समोर भवानी शंकराच्या पितळेचा नागफणा माडून त्या्समोर चिखलाची नागदेवता तयार करुन ठेवतात. नागपंचमी निमीत्त स्थानिक महिला नागोबाच्या पुजेसाठी येऊन या नागोबास दुध, लाहया, उकडलेले कानवले दाखवतात. दुध नागोबास घालुन, पुजाआरती करुन, दो-याचे पवते अर्पण करतात. त्यानंतर उत्तर पूजा करून कल्लोळ तीर्थ मध्ये विसर्जन केले जाते.
(नारळी पौर्णिमा-रक्षाबंधन)
चरणतिर्थास व धुपआरतीच्या वेळी श्रीस राखी रक्षाबंधन निमीत्त अर्पण करण्यात येते. या दिवशी सकाळच्या अभिषेक पुजेच्या वेळी मंदिर संस्थानाचा प्रतिनिधी अभिषेक पुजेस हजर रहावे लागते. अभिषेक पूजा झाल्यानंतर पुजारी श्री पंचआरती ओवाळतात. . श्रावण अमावस्या (बैलपोळा ) श्रावण अमावस्या दिवशी संध्याकाळी पाच वाजता मठाचे महंत यांच्या बैलाचे कमानवेस भागात आगमन होते. श्री देवीच्या गाभाऱ्यात आणून त्यांना श्री देवीच्या पायाचे कुंकू लावण्यात येते.
(सायंकाळी श्रीची मंचकी निद्रा) (घोर निद्रा)
या दिवसापासून ते शारदीय नवरात्र उत्सव प्रारंभ होईपर्यंत मंचकी निद्रा सुरू होते.यादिवशी सकाळी चरण तिर्थ झाल्यानंतर पलंगे शयन कक्षातील पलंगावरील गाद्या, लोड गिरदया, गणेश विहार येथे काढून अनुन ठेवतात.
या दिवशी बाहेर गावावरुन नवरात्र उत्सव मंडळी व दिपप्रज्वलीत करुन नेण्यासाठी असंख्य मंडळे तुळजापूरात दाखल होतात. मंदिरातुन पुजा करुन मशालीची पुजा करुन मशाल मंदिरातील दिव्यास लावुन पेटवून आपापल्या गावातील नवरात्र उत्सावातील देविची स्थापना केलेल्या ठिकाणचे दिवे या मशालीने प्रज्ववलीत करुन उत्सव साजरा करतात. या दिवसापासून दुस-या दिवशी घटस्थापनेपर्यत गावोगावचे तरुण आपापली तरुण मंडळे घेवून येतात. मंदिरात पेटवलेली ज्योत ते आपल्याा गावापर्यत क्रमाक्रमाणे ज्योत घेऊन पायी ( धावत) जातात. गावी पोहचल्याानंतर विधीपूर्वक घटस्थापना करुन पुजा,आरती, नऊ दिवस करतात.
(घटस्थापना)
नवरात्र महोत्सव निमित्त मंदिराचा संपूर्ण परिसर धुवून स्वच्छ करण्यात येतो. मंदिरातील द्वार, महाद्वारांना आंब्याच्या पानाचे तोरण व नारळाचे फड बांधण्यात येतात. आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून तुळजाभवानी मंदिरात शारदीय नवरात्र उत्सव प्रारंभ होतो. दुपारी बारा वाजता घटस्थापना होते. नऊ दिवस नऊ माळा घालण्यात येतात आणि विविध प्रकारचे अलंकार पूजा दैनंदिन नवरात्र ललित पंचमी पासून करण्यात येतात. नवरात्र महोत्सव काळात दैनंदिन छबिना काढण्यात येतो. श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिरांमधील एक अद्भुत असा दसरा उत्सव आहे. श्री तुळजाभवानी मातेची मूर्ती ही मंदिर परिसर मधील पिंपळाच्या पारावर आणून पालखीमध्ये ठेवून मंदिर प्रदक्षिणा करण्यात येते. भावी हळदी कुंकू याची उधळण श्री देवीच्या पालखीवर करतात. या उत्सवाला सिमोल्लंघन उत्सव असे म्हणतात. या उत्सवामध्ये लाखो भाविक सहभागी होतात.
अश्विन ते कार्तिक महिन्यात येणारा दीपावली उत्सव तुळजाभवानी मंदिरात साजरा करण्यात येतो. दीपावली उत्सवानिमित्त श्री तुळजाभवानी मातेस सुगंधी द्रव्यासह स्नान घातले जाते आणि दैनंदिन पूजा विधी होता. तुळजाभवानी देवीचा गाभारा आणि मंदिर परिसर आकर्षक फुलांनी सजवला जातात .
(भिंडोळी)
या दिवशी सकाळच्या् पुजा ठरल्याप्रमाणे होवून संध्याकाळच्याा पुजेसाठी दशावतार मठाधिपतींची पुजा पूर्वी गरीबनाथ बुवा हे काशीतिर्थ यात्रेस जोतेवेळी श्रीचे दर्शन व परवानगी घेवून जाण्याकरीता मंदिरात आल्याानंतर श्रीने त्यांना दृष्टांत देवून काशिस जाणेची आवश्य कता नाही . परंतु सदर महंताने तिर्थ यात्रेचा संकल्प केल्यामुळे ते श्रीचे दर्शन घेवून पुढे तिर्थ यात्रेस जाण्यातकरीता निघाले असता श्रीने त्यांच्या जवळ एक वेताची काठी, लिंबु, हळद कुंकू यांचेसोबत दिले व काशि येथील गंगेस अर्पण करण्यास सांगितले. त्या प्रमाणे महंतानी काशी यांत्रेस येथील गंगेमध्ये श्रीने दिलेले वेताची काठी, लिंबु गंगेस अर्पण केले.
(पाडवा)
या दिवशी साडेतीन मुहुर्तापैकी एक मुहुर्त असल्याने श्रीचे चरण तिर्थ पहाटे लवकर करण्यात येते. त्यादिवशी मंदिर संस्थातनचे वतीने नैवेद्य , फराळाचे लाडू, करंज्यात, आनारसे व नेहमीप्रमाणे असा नैवेद्य देण्याित येतो. महाआरती, आवटी यांचेकडून व्येवस्थाापक यांचे घरी येते. येथून सवाद्य आरती मंदिरात प्रवेशल्या नंतर महंत चरणतिर्थ करणेस मंदिरात येतात. चरण तिर्थसआलेनंतर त्यां चे सोबत मंदिर संस्थाान प्रतिनिधी व कर्मचारी आरती घेवून पुढे येतात. चोपदार दरवाज्यातत येवून थांबतात. महंत चोपदार दरवाजा उघडून मध्येन प्रवेश करतात. नमस्का र करुन कुंकू लेवून नंदादीप प्रज्व लीत करुन प्रथम नैवेद्य सरकार यांचा दाखवतात.
(त्रिपुरारी पौर्णिमा)
या दिवशी त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त श्री कल्लोळ तिर्थ स्वच्छ धुवून येथे कल्लोळ तिर्थ मध्ये ताटवा पुजन करुन साडेसातशे कापसाच्या वातीपंत्यामध्ये लावून कल्लोळ तिर्थ ताटवापुजन केले जाते . या पणत्या द्रोणावर ठेवून पाण्यावर तरंगत सोडतात. संध्याकाळी देवीचा छबिना काढण्यात येऊन जोगवा मागण्यात येतो.
शाकंभरी नवरात्र उत्सवात दुपारी बारा वाजता घटस्थापना होते. नऊ माळा घालण्यात येतात आणि विविध प्रकारचे अलंकार पूजा करण्यात येतात. श्री तुळजाभवानी मंदिर परिसरात घटस्थापना होते याच नवरात्र महोत्सवात गावातून जल यात्रा काढली जाते. शाकंभरी नवरात्र महोत्सवात तुळजाभवानी देवीचा गाभारा आणि मंदिर परिसर फुलांनी सजवला जातो.
श्री तुळजाभवानी माता वर्षातून 21 दिवस निद्रा घेते. व 344 दिवस देवी अष्टोप्रहर जागृत असते. तुळजाभवानी देवीची निद्रा तीन प्रकारात विभागले आहे ती अशी १. घोर निद्रा २. श्रम निद्रा ३.मोह निद्रा .तुळजाभवानी देवीची मूळ मूर्ती सिंहासनावरून उचलून गाभाऱ्या बाहेर असणाऱ्या पलंगावर देवी निद्रासाठी असते.
Copyright©2024. Tuljabhavani Pujari Tuljapur
Designed by DY Business Solutions